औरंगाबाद, दि. 05
औरंगाबाद जिल्ह्यात आज 133 जणांना सुटी देण्यात आली असून आजपर्यंत 3374 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज सुटी दिलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 77 तर ग्रामीण भागातील 56 जणांचा समावेश आहे. आज एकूण 217 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातीत एकुण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6730 एवढी झाली आहे. आजपर्यंत 310 जणांचा मृत्यू झाला असल्याने एकूण 3046 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात वाढलेल्या 217 रुग्णांपैकी औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 167, ग्रामीण भागातील 50 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये 120 पुरूष तर 97 महिला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.सायंकाळनंतर आढळलेल्या रुग्णांमध्ये 16 पुरूष आणि दहा महिला आहेत.
औरंगाबाद शहरातील रुग्ण (25)
सिंधी कॉलनी (1), अन्य (4), दिशा नगरी, बीड बायपास (1), केबीएच हॉस्टेल, बीड बायपास (3), एन दोन सिडको (2), नवजीवन कॉलनी (2), राजीव गांधी नगर, एन दोन, सिडको (2), हिमायत बाग हर्सुल रोड (1), गारखेडा परिसर (1), पडेगाव (1), रमा नगर (1), नाईक नगर, देवळाई परिसर (1), तारक कॉलनी सातारा परिसर (2), एन तीन सिडको (1), राठी नगर (1), नारेगाव (1), सईदा कॉलनी (1)
ग्रामीण भागातील रुग्ण (1)
सिल्लोड (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
घाटीत दहा, खासगीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) चार जुलै रोजी नारळीबाग येथील 68 वर्षीय स्त्री, उस्मानपुऱ्यातील 50 वर्षीय स्त्री, जालना जिल्ह्यातील जामखेडा, अंबड येथील 17 वर्षीय स्त्री, क्रांती चौकातील रमा नगर येथील 63 वर्षीय स्त्री, बायजीपुऱ्यातील 66 वर्षीय पुरूष, पाच जुलै रोजी घाटी क्वार्टर येथील 66 वर्षीय पुरूष, शहा बाजार येथील 50 वर्षीय स्त्री, न्यू हनुमान नगर, गारखेडा येथील 72 वर्षीय पुरूष, मुकुंदवाडीतील स्वराज नगरातील 42 वर्षीय पुरूष आणि एन सहा संभाजी कॉलनी, सिडकोतील 75 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत 243 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 236 कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. तर शहरातील एका खासगी रुग्णालयात एन चार सिडकोतील 80 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 236, विविध खासगी दवाखान्यांमध्ये 72, जिल्हा सामान्य रुग्णालयात 02 अशा एकूण 310 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
No comments:
Post a Comment