Tuesday, July 7, 2020

नांदेडात 200 खाटांचे नवीन हॉस्पिटल व सी.टी.स्कॅन विभागाचे अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

नांदेड/ प्रतिनिधी


 नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक अद्यावत असे जिल्हा रुग्णालय संकुल निर्माण करण्याचा माझा मानस आहे. याचाच एक भाग असलेल्या 200 खाटांच्या नविन हॉस्पिटलचे लोकार्पण करतांना मला मनस्वी आत्मिक समाधान असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकिय रुग्णालय येथील 200 खाटांच्या अद्ययावत बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीचे व सी. टी. स्कॅन विभागाचे लोकार्पण आज त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

शासकिय निमयामांच्या अंतर्गत निवडक उपस्थितीत छोटेखानी झालेल्या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर सौ. दिक्षा धबाले, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे आदि मान्यवर उपस्थित होते.

नांदेड येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या इतर इमारती या अत्यंत जीर्ण झाल्या असून याचा कायापालट करणे आवश्यक झाले आहे. जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेत सहाय्यभुत ठरणारे येथील नर्सींग कॉलेज व इतर विभागांना चांगल्या इमारतीची गरज आहे. हे लक्षात घेता आजच्या घडिला जिल्हा रुग्णालय परिसरात उपलब्ध असलेल्या जागेवर लवकरच अद्ययावत वैद्यकिय सुविधांचे एकत्रित संकुल लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. याठिकाणी सी. टी. स्कॅन विभागाचीही अत्यंत गरज होती. ती गरज लक्षात घेऊन या 200 खाटाच्या ओपीडीसह हा सी. टी. स्कॅन विभागही जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या आरोग्य विषयक गरजा पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवीन उभारण्यात आलेल्या या इमारतीची स्वच्छता व येथील उपकरणांची निगा ही तितक्याच गुणवत्तापूर्ण पद्धतीने घेतली पाहिजे. शासन जनतेच्या सुविधेसाठी चांगल्या वास्तू निर्माण करते मात्र कालांतराने त्याठिकाणी स्वच्छता व निगा याबाबत फारशी काळजी घेतल्या जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त करुन या नवीन वास्तुच्या स्वच्छतेबद्दल योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले.

कोरोना आपत्तीमुळे जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करुन त्यांना जनतेच्या सेवेत तत्पर ठेवणे हे अतिशय महत्वाचे झाले आहे. यासाठी येत्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकटीकरण, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी 41.54 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 5 कोटी 28 लक्ष 66 हजार रुपये एवढा निधी किनवट आणि माहूर तालुक्यातील आदिवासी भागात आरोग्य सेवा बळकटी करणासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या नवीन 200 खाटांच्या रुग्णालयात प्राथमिक तपासणी, पॅथॉलॉजी विभाग, क्ष किरण विभाग, ओपीडी, इंजेक्शन आणि ड्रेसिंग, डायलेसीस, औषध भांडार, महानगर ब्लड बँक, फिजिओ थेरपी, प्रतिक्षागृह आदि अद्ययावत वैद्यकिय सुविधा अंतर्भूत केल्या आहेत.

सद्यस्थितीत कोरोनाचे आव्हान लक्षात घेता ही नवीन 200 खाटांचे इस्पितळ कोविडसाठी उपयोगात आणले जाणार आहे. 

Monday, July 6, 2020

औरंगाबादेत आज 77 रुग्णांची वाढ; कन्नड मध्ये कोरोनाचा थैमान सुरूचP

औरंगाबाद, दि. 07 औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 77 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 72 तर ग्रामीण भागातील 05 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 37 पुरूष तर 40

महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7017 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 3571 रुग्ण बरे झालेले असून 318 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने 3128 जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या 725 स्वॅबपैकी आज 77 अहवाल सकारात्मक (Positive) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण –(72)
घाटी परिसर (1), बेगमपुरा (4), सुरेवाडी (1), पिसादेवी, गौतम नगर (3), बड्डीलेन (2), जटवाडा रोड (3), कांचनवाडी (1), आंबेडकर नगर,एन सात (20), सातारा परिसर (4), विष्णू नगर (2), न्यू हनुमान नगर (1), विजय नगर (11), विशाल नगर (1), गौतम नगर (1), लोटा कारंजा (2), नागेश्वरवाडी (3), नारळीबाग (6), एकनाथ नगर (3), चेलिपुरा काझीवाडा (2), सिव्हिल हॉस्पीटल परिसर (1)

*ग्रामीण भागातील रूग्ण (5)
हतनूर, कन्नड (1), विवेकानंद कॉलनी, फुलंब्री (4) या भागातील कोरोनाबाधित आहेत

फळबाग लागवड करून उत्पन्न वाढवा- खासदार प्रताप पाटील चिखलीकर

फळबाग लागवड करुन उत्पन्न वाढवा - खासदार प्रताप पाटील चिखलीकर

कंधार/प्रतिनिधी

कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत जिल्ह्यात 1 ते 7 जुलै यादरम्यान कृषी संजीवनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील गावात कृषी योजनांचा जागर सुरू आहे. यामध्ये उत्पादन तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जाते आहे.
रविवार 5 जुलै रोजी कंधार तालुक्यात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या उपस्थितीत चिखली येथे फळबाग लागवडीचा शुभारंभ व जलपुजन करण्यात आले. यावेळी चिखलीचे सरपंच  ललीताबाई चिखलीकर, संतोष क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, बारूळ मंडळ कृषी अधिकारी आर. एम. भुरे, कृषी पर्यवेक्षक बालाजी डफडे, कृषी सहाय्यक  उज्वला देशमुख, परमेश्वर मोरे, गोविंद तोटावाड, एम. एम. राठोड, गोगदरे, शेतकरी प्रकाश तोटावाड, सतीश पवळे, माजी सरपंच पांचाळ, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
कंधार तालुक्यात आज अखेर कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत तालुक्यातील 85 गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कंधार तालुक्यातील पानभोसी, बहादरपुरा, शिरढोण, आलेगाव, हाळदा, चिंचोली प क येलूर, अंबुलगा, उस्माननगर, लाठ खू, फुलवळ, पानशेवडी, बारुळ या गावासह एकूण 85 गावात हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात गावातील सरपंच, प्रगतशील शेतकरी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शेतकरी बैठका घेऊन विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. विविध गावांना भेटी देत शेतकऱ्यांना पीक उत्पन्नावाढीच्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे.
तालुक्यातील विविध गावात 

विकास नारळीकर, आर. एम. भुरे, कृषी पर्यवेक्षक रोहीणी पवार, आत्माराम धुळगुंडे, अहेमद खॉ पठाण, बालाजी डफडे, संभाजी डावळे, दत्ता रामरूपे यांच्यासह कृषी सहाय्यक सोपान उबाळे, परमेश्वर मोरे, शिवाजी सूर्यवंशी, सुनील देशमुख, गोविंद तोटावाड, माधव गुट्टे, कल्पना जाधव, भूषण पेटकर, एन. बी. कुंभारे, गजानन सूर्यवंशी, संतोष वाघमारे, जी. एम. कळणे यांच्यासह तालुक्यातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गाव बैठका घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड एकात्मिक किड रोग व्यवस्थापन एकात्मिक खत व्यवस्थापन, लिंबोळी अर्क तयार करणे, सोयाबीन उगवण यासह पिक विमा राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना, ठिबक सिंचन, कृषी यांत्रिकीकरण फळबाग लागवड, शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजना याबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात येत आहे. गावा-गावात माहितीपत्रके शेतकरी मासिके देऊन नवीन वर्गणीदार करून घेण्यासाठी माहिती दिली. कंधार अंतर्गत प्रचार वाहन व त्यावर ध्वनिक्षेपक लावून गावोगावी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुक्यातील संपूर्ण गावात जनजागृती करून कार्यक्रम घेण्यात येत आहे. कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, पोखर्णी तसेच कापूस संशोधन केंद्र नांदेड येथील शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Breaking औरंगाबादेत 10 ते 18 जुलै संचारबंदी

औरंगाबाद/ प्रतिनिधी

आज औरंगाबाद पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी पत्रकार परिषद घेतली. औरंगाबादमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे जर लोकांनी सहकार्य केलं नाही तर 10 तारखेनंतर संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरासोबतच ग्रामीण भागातही घट्ट होत आहे. वाळूज व परिसरातील सात ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. त्यामुळे वाळूजला चार जुलैपासून संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे शहरातही संचारबंदी लागू करायची का? यासाठी सोमवारी बैठक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, महापालिका, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाची विभागीय आयुक्तालयात बैठक झाली. बैठकीला खासदार भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, अंबादास दानवे यांच्यासह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, घाटीच्या डीन कानन येळीकर यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.

Sunday, July 5, 2020

औरंगाबादेत 3374 कोरोनामुक्त, 3046 रुग्णांवर उपचार सुरू


औरंगाबाद, दि. 05

औरंगाबाद जिल्ह्यात आज 133 जणांना सुटी देण्यात आली असून आजपर्यंत 3374 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज सुटी दिलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 77 तर ग्रामीण भागातील 56 जणांचा समावेश आहे. आज एकूण 217 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातीत एकुण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6730 एवढी झाली आहे. आजपर्यंत 310 जणांचा मृत्यू झाला असल्याने एकूण 3046 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात वाढलेल्या 217 रुग्णांपैकी औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 167, ग्रामीण भागातील 50 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये 120 पुरूष तर 97 महिला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

सायंकाळनंतर आढळलेल्या रुग्णांमध्ये 16 पुरूष आणि दहा महिला आहेत. 
औरंगाबाद शहरातील रुग्ण (25)
सिंधी कॉलनी (1), अन्य (4), दिशा नगरी, बीड बायपास (1), केबीएच हॉस्टेल, बीड बायपास (3), एन दोन सिडको (2), नवजीवन कॉलनी (2), राजीव गांधी नगर, एन दोन, सिडको (2), हिमायत बाग हर्सुल रोड (1), गारखेडा परिसर (1), पडेगाव (1), रमा नगर (1), नाईक नगर, देवळाई परिसर (1), तारक कॉलनी सातारा परिसर (2), एन तीन सिडको (1), राठी नगर (1), नारेगाव (1), सईदा कॉलनी (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (1)
सिल्लोड (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

घाटीत दहा, खासगीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) चार जुलै रोजी नारळीबाग येथील 68 वर्षीय स्त्री, उस्मानपुऱ्यातील 50 वर्षीय स्त्री, जालना जिल्ह्यातील जामखेडा, अंबड येथील 17 वर्षीय स्त्री, क्रांती चौकातील रमा नगर येथील 63 वर्षीय स्त्री, बायजीपुऱ्यातील 66 वर्षीय पुरूष, पाच जुलै रोजी घाटी क्वार्टर येथील 66 वर्षीय पुरूष, शहा बाजार येथील 50 वर्षीय स्त्री, न्यू हनुमान नगर, गारखेडा येथील 72 वर्षीय पुरूष, मुकुंदवाडीतील स्वराज नगरातील 42 वर्षीय पुरूष आणि एन सहा संभाजी कॉलनी, सिडकोतील 75 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत 243 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 236 कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. तर शहरातील एका खासगी रुग्णालयात एन चार सिडकोतील 80 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 236, विविध खासगी दवाखान्यांमध्ये 72, जिल्हा सामान्य रुग्णालयात 02 अशा एकूण 310 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

बुरुड समाजाच्या वतीने कंधार पोलिसांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप



कंधार /प्रतिनिधी
  •  बुरुड समाज या सामाजिक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रते गणेश ठेवरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 
  • कं
    धार येथिल पोलिस स्टेशन येथे सँनिटायजर व मॉस्कचे वाटप दि.५ जुलै रोजी करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक विकास जाधव,नगरसेवक सुनिल कांबळे ,लोहा येथिल नगरसेवक पंचशिल कांबळे,मयुर कांबळे ,राजहंश शहापुरे ,बाळासाहेब पवार आदी मान्यवरांच्या हस्ते पोलीस कर्मचारी गणेश  राठोड, कागणे ए.एस आय,राठोड नामदेव ,संजय राठोड ,नामदेव वानरे ,चव्हाण प्रेमदास ,गणेश सुर्यवंशी ,अप्पाराव वरपडे ,चोपडे ,.अनुसया केंद्रे ,त्रिशला कांबळे ,होमगार्ड ज्योती कदम आदीना सँनिटायजर व मॉस्कचे वाटप करण्यात आले.

Thursday, July 2, 2020

आणखी तीन महिने मिळणार शिवभोजन 5 रुपयांत

मुंबई /प्रतिनिधी
लॉकडाऊन संपलेला असला तरी असामान्य परिस्थितीमुळे आणखी तीन महिने 5 रुपयांमध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे करोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये, यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये गरजूंना जेवण देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतलेला होता. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र, अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे.
शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी 11 ते 3 या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी शासनाने 160 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मे आणि जून महिन्यामध्ये एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रति व्यक्ती देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतलेला होता. सदर योजना आणखी दोन महिने चालू ठेवली जाणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या 3 कोटी 8 लाख नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

कृषी सन्मान योजनेचे 6 हजार रुपये मिळत नसतील तर, करा या दुरुस्ती

नवी दिल्ली । प्रधानमंत्री कृषीसन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची मदत केली जाते. शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपये करुन प्रत्येकी 3 महिन्याच्या कालावधीत त्यांच्या बॅंक खात्यात रक्कम वर्ग करण्यात येते. या योजनेचा पुढचा हफ्ता ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. बहुतांश शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे खरे, तसेच त्यांनी आवेदन सुद्धा केले आहे. परंतु तरीसुद्धा, अनेक शेतकरी या कृषीसन्मान योजनेपासुन वंचित राहिलेले आहेत.

पैसे का बरं आले नाही? ऑगस्टमध्ये हफ्ता भेटणार का?

असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच त्यांचे पैसे खात्यात वर्ग करण्यात आलेले नाही. कारण बहुतांश लाभार्थांचे कागदपत्रात त्रुटी आहे. तर कोणाचे आधार कार्ड वरील नाव चुकीचे आहे, कुणाचे बॅंक खात्यावरील नाव चुकीचे असल्याने त्यांना ह्या योजनेचा लाभार्थी होत येत नाही.

काय आहे या समस्येचा समाधान ।

प्रधानमंत्री कृषीसन्मान योजनेच्या वेबसाईट http://pmkisan.gov.in/ वर जाऊन Farmer कॉर्नरवर जाऊन Edit Aadhar Details वर जाऊन चुकलेले फार्म दुरुस्त करता येतो.

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी जुलै अखेर होणार पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ

मुंबई : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल,असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले 

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असतांना देशासह राज्यात कोविड-१९ चे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. कोविड-१९ चा प्राद्रुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला असेही सहकार मंत्री म्हणालेसध्या खरीप परेणीचा हंगाम सुरू झाला आहे. तिसऱ्या यादीतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी २ हजार कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे.जुलै अखेरपर्यंत सव्वा आकरा लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ८ हजार २०० कोटी रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे सहकार मंत्री यांनी आवाहन केले.कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोविड-१९ च्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज द्यावे अशा सूचनाही शासनाने बँकांना दिल्या होत्या असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरूच, आज 206 रुग्णांची वाढ




औरंगाबाद, दि. 02 (जिमाका) :  औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी  206 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 122 पुरूष, 83 महिला व अन्य एक आहेत. आतापर्यंत एकूण 5988 कोरोनाबाधित आढळले असून 2857 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 271 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2860 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.परीक्षण करण्यात आलेल्या 1200 स्वँब पैकी 206 अहवाल सकारात्मक (Positive ) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. 
*औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (171)*
सिडको (1), गजानन नगर, गारखेडा (1), काबरा नगर, गारखेडा (1), फुले नगर, उस्मानपुरा (1), नारळीबाग (2), पुंडलिक नगर (4), सिडको एन-अकरा (3), मिसरवाडी (2), शिवाजी नगर (6), सुरेवाडी (1), जाधववाडी (5), सातारा परिसर (3), छावणी (5), द्वारकापुरी, एकनाथ नगर (6), आयोध्या नगर (2), नवनाथ नगर (1),  रायगड नगर (2), उल्कानगरी (1), शिवशंकर कॉलनी (10), एन बारा टी व्ही सेंटर (3), पोलिस कॉलनी, पडेगाव (5),बेगमपुरा (1), मेडिकल क्वार्टर परिसर (1), रवींद्र नगर (2), पडेगाव (2), बायजीपुरा (3), समता नगर (1), मयूर पार्क (1), नागेश्वरवाडी (1), रोकडिया हनुमान कॉलनी (1), कृष्णा नगर, बीड बायपास (1), ज्योती नगर (1), एन सात सिडको, बजरंग चौक (2), हनुमान नगर (7), उस्मानपुरा (2), भोईवाडा (2), बन्सीलाल नगर (1), कुंभारवाडा (2), रमा नगर (1), शांतीनिकेतन कॉलनी (1), भाग्य नगर (10), सौजन्य नगर (1), कांचनवाडी (13), नाथ नगर (3), राहुल नगर (6), देवळाई परिसर (1),हायकोर्ट परिसर (1), राम नगर (1), नवजीवन कॉलनी (1), अल्तमश कॉलनी (1), ठाकरे नगर (3), एन दोन सिडको (1), एन सहा सिडको (2), सावंगी हॉस्पीटल परिसर (1), सावंगी, हर्सुल (2), न्याय नगर (1), एन नऊ सिडको (2), विशाल नगर (3), एसटी कॉलनी (6), सेव्हन हिल (1), गांधी नगर (2), गुरु सहानी नगर (1), टीव्ही सेंटर (1), सदाशिव नगर (1), एकनाथ नगर (1), खोकडपुरा (1), मुकुंदवाडी (1), द्वारकानगरी, एन अकरा (1), एन बारा, हडको (2), नूतन कॉलनी (1), अन्य (1)

*ग्रामीण भागातील रुग्ण (35)*
शिवाजी नगर, वाळूज (1), शरणापूर (2), चिरंजीव सो,लोकमान्य चौक, बजाज नगर (3), सिडको महानगर (2), कमलापूर, बजाज नगर (1), जीएम नगर, रांजणगाव (1), एसटी कॉलनी, बजाज नगर (1), पाण्याच्या टाकीजवळ, बजाज नगर (1), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (1), आयोध्या नगर, बजाज नगर (1), अनिकेत सो., बजाज नगर (1), चिंचबन कॉलनी (1), नागापूर कन्नड (1) कोहिनूर कॉलनी (1), गंगापूर माळूंजा (1), वाळूज गंगापूर (3), अरब गल्ली गंगापूर (3), दर्गाबेस वैजापूर (10) या भागातील कोरोनाबाधित आहेत. 
******

Wednesday, July 1, 2020

औरंगाबाद जिल्ह्यात 2753 रुग्णांवर उपचार सुरू, 192 रुग्णांची वाढ


औरंगाबाद, दि. 01

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 192 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 115 पुरूष, 77 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 5757 कोरोनाबाधित आढळले असून 2741 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 263 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2753 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या 866 स्वॅबपैकी 192 अहवाल सकारात्मक (Positive) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. 
औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (116)
फातेमा नगर, हर्सुल (1), जुना बाजार (1), शिवशंकर कॉलनी (2), एन दोन, विठ्ठल नगर (2), न्यू पहाडसिंगपुरा (2), हर्सुल (3), नंदनवन कॉलनी (2),पुंडलिक नगर (3), विवेकानंद नगर (2), विशाल नगर (5), सातारा परिसर (6), एन चार सिडको (1), संजय नगर, मुकुंदवाडी (2), रेणुका नगर (3), सिंधी कॉलनी (1), लक्ष्मी नगर, गारखेडा (1), न्यू हनुमान नगर (4), शिवाजी नगर (9), आंबेडकर नगर (2), विजय नगर (2), पोलिस कॉलनी, टीव्ही सेंटर (2), एन अकरा,पवन नगर (1), मुकुंदवाडी (4), एन सहा सिडको (1), जाफर गेट (1), आकाशवाणी परिसर (1), उस्मानपुरा (1), जाधववाडी (1), एन दोन, सिडको (2), सातव नगर (1), नूतन कॉलनी (1), टीव्ही सेंटर (1), गारखेडा (4), एम दोन, सिडको (2), सुरेवाडी (5), विष्णू नगर (1), गजानन नगर (1), रायगड नगर, एन नऊ (1), पडेगाव (1), छावणी (1), समर्थ नगर (1), भाग्य नगर (1), हिंदुस्तान आवास (5), उत्तम नगर (3), तानाजी नगर (5), शिवाजी कॉलनी (1), हनुमान नगर (4), कैलास नगर (1), जय भवानी नगर (1), जाधवमंडी (1), स्टेशन रोड परिसर (1), अहिंसा नगर (1), गादिया विहार (1), देवळाई (1), अन्य (2)
ग्रामीण भागातील रुग्ण (76)
हनुमान नगर, वाळूज (2), कन्नड (1), कृष्णा कोयना सो., बजाज नगर (2), सिंहगड सो., बजाज नगर (1), महाराणा प्रताप चौक, बजाज नगर (3), सारा गौरव, बजाज नगर (1), चिंचवन कॉलनी, बजाज नगर (4), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (3), क्रांती नगर, बजाज नगर (1), शहापूरगाव, बजाज नगर (1), बजाज नगर (2), वडगाव, शिवाजी चौक, बजाज नगर (2), स्नेहांकित सो., बजाज नगर (1), साईनगर, बजाज नगर (1), रांजणगाव (2), वाळूज महानगर सिडको (1), साऊथ सिटी (4), बीएसएनएल गोडावून, बजाज नगर (1), भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर (1), अयोध्या नगर, बजाज नगर (1), उत्कर्ष सो. बजाज नगर (1), बजाज विहार, बजाज नगर (1), स्वामी सो., बजाज नगर (1), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (1), बजाज नगर (1), रामपूरवाडी, करंजखेड, कन्नड (3), नागद तांडा, कन्नड (1), कुंभेफळ (6), फर्श मोहल्ला, खुलताबाद (2), राजीव गांधी, खुलताबाद (1), पाचोड (1), खुलताबाद रोड, फुलंब्री (1), हरिओम नगर, रांजणगाव, गंगापूर (2), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), कान्होबा वाडी, मांजरी (1), अजब नगर, वाळूज (1), दर्गाबेस, वैजापूर (11), पोखरी, वैजापूर (2), बाभूळगाव (1), साकेगाव (2) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

नांदेडात 200 खाटांचे नवीन हॉस्पिटल व सी.टी.स्कॅन विभागाचे अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

नांदेड/ प्रतिनिधी  नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक अद्यावत असे जिल्हा रुग्णालय ...